Advertisement

पैसे मागितल्यावरून फोटोग्राफरच्या भावाचे डोके फोडले

प्रजापत्र | Saturday, 20/11/2021
बातमी शेअर करा

केज– लग्नात काढलेल्या फोटो अल्बमचे पैसे वारंवार का मागतोस असे म्हणत फोटोग्राफरच्या भावास एकाने काठीने मारून डोके फोडले. तर इतर दोघांनी बेल्टने मारहाण केल्याची घटना केज तालुक्यातील पिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

         पिंपळगाव येथील विनोद श्रीराम गायकवाड ( वय ३५ ) हे गावातील ग्रामपंचायतीत ऑपरेटर पदावर नोकरीस असून त्यांचा भाऊ हा फोटोग्राफर आहे. त्याने तीन वर्षांपूर्वी पांडुरंग हनुमंत जाधव यांच्या लग्नात फोटो काढून अल्बम तयार करून दिला. मात्र त्याचे पैसे न मिळाल्याने तो पांडुरंग जाधव यांना वारंवार पैसे मागत होता. त्यावरून त्यांच्या बाचाबाची झाल्याने श्रीराम गायकवाड यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. परंतु १८ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता गावातील भैरवनाथ विद्यालयाजवळ गाठून पांडुरंग जाधव याने शिवीगाळ करीत काठीने मारहाण करून गायकवाड यांचे डोके फोडले. तर इतर अनोळखी दोघांनी बेल्टने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद श्रीराम गायकवाड यांनी दिल्यावरून पांडुरंग जाधव व इतर अनोळखी दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून जमादार उमेश आघाव पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement