केज दि.१३ (वार्ताहर)-केज-अंबाजोगाई रोडवर माऊली साउंड सर्व्हिस या दुकानासमोर शनिवार (दि. १३) सायंकाळी ७:१५ च्या सुमारास एकाच मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
येथील केज-अंबाजोगाई या महामार्गावर माऊली साउंड सर्व्हिस या दुकाना समोर अंदाजे ४५ वर्ष वयाच्या इसमाने प्रेत आढळून आले. पोलीसांना माहिती मिळताच पोलीस जमादार धनपाल लोखंडे, बाळासाहेब अहंकारे आणि पत्रकार गौतम बचुटे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या जवळ बँकेचे पासबुक आढळून आले. त्यावर विलास महादेव घुले (रा.लाडेवडगाव ता. केज) असे नाव आहे. लाडेवडगाव येथे या बाबत अधिक चौकशी केली असता सदर मयत हा बेवारस असून त्याला जवळचे कोणी नातेवाईक नसल्याचे समजते.
बातमी शेअर करा