Advertisement

डोक्यात दगड मारून महिलेचे डोके फोडले

प्रजापत्र | Wednesday, 10/11/2021
बातमी शेअर करा

केज दि.10 – पाईप लाईनच्या लिकेजच्या पाण्या वरून झालेल्या भांडणात महिलेच्या डोक्यात दगड मारून जखमी करून तिच्यात पतीलाही मारहाण केल्या प्रकरणी दोघाजणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

             या बाबतची माहिती अशी की, दि. ९ नोव्हेंबर रोजी अल्का भांगे रा. सातेफळ ही तिच्या शेतात कापूस वेचणी करीत होती. तिचे पती कुमार भांगे त्यांच्या शेतातील पाईपलाईन दुरुस्त करीत असताना त्यांच्या शेजारील विश्वास भांगे व त्याची पत्नी सुनिता भांगे हे दोघे नवरा-बायको हे कुमार भांगे यास शेतातील पाईपलाईनच्या लिकेजचे पाणी त्याच्या शेतात का आले? या कारणा वरून शिवीगाळ करून भांडण करीत होते. भांडणाचा आवाज ऐकू आल्याने अल्का त्यांच्या जवळ गेली व  का भांडता ? असे विचारले म्हणून त्याचा राग येऊन विश्वास भांगे याने अल्का भांगे हिच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली. तसेच विश्वास भांगे व अनिता भांगे या दोघा नवरा-बायकोनी कुमार भांगे यास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.

 

                            या प्रकरणी अल्का भांगे हिने दि. ९ नोव्हेंबर रोजी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून ठाणे अमंलदार देवा कांबळे यांनी फिर्याद नोंदवून घेतली. विश्वास भांगे व त्याची पत्नी अनिता भांगे या दोघा नवरा बायकोच्या विरुद्ध गु. र. नं. १७८/२०२१ भा. दं. वि. ३२४, २३२, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगनाथ राठोड हे पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement