सिरसाळा-येथील हायस्कुल परिसरातील एका घरात शनिवारी (दि.६) रात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असून तलवार आणि चाकूचा धाक दाखवून नगदी ९२ हजार आणि सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी सिरसाळा पोलिसांनी धाव घेऊन चोरीच्या तपासासाठी श्वान पथक, फिंगरप्रिंट तज्ञ पाचारण केले होते.
संपत पुरी व त्यांचे कुटुंब झोपेत असतांना अज्ञात दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करत त्यांची पत्नी व मुलीला तलवारीचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. त्याचबरोबर संपत पुरी यांना मारहाण करून त्यांच्याकडील ९२ हजार रूपये लुटले. कपाटातील इतर साहित्य दरोडेखोरांनी चोरून नेले. हे दरोडेखोर हिंदी भाषेत बोलत असल्याचे पुरी कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले. घटनेची माहिती सिरसाळा पोलीसांना झाल्यानंतर पीएसआय जोंधळे, एकशिंगे, पीएसआय शेळके, मिसाळ, संजय वडमारे, नसिर शेख, सखाराम पवार, अशोक दुबाले, यांच्यासह आदींनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी श्वान पथक, फिंगरप्रिंट तज्ञ, स्थानिक गुन्हे शाखेला पाचारन करण्यात आले होते. या घटनेने सिरसाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपस सुरु आहे.