Advertisement

केज शहरातील क्रांतीनगर भागात पोलिसांची धाड

प्रजापत्र | Tuesday, 02/11/2021
बातमी शेअर करा

केज दि.२ – शहरातील क्रांतीनगर भागात बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मिती व विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सदरील ठिकाणी छापा मारून हातभट्टी दारू व रसायन जप्त केले असून आरोपी ताब्यात घेतला आहे.

शहरातील क्रांतीनगर भागात यापूर्वीही कित्येक वेळा पोलीस कारवाई होऊनही गुन्हेगारांवर जरब बसलेली नाही. पोलिसांची धाड पडली की तेवढे एकदोन दिवस अवैध दारू विक्री बंद होते आणि पुन्हा पूर्ववत होते. सदरील ठिकाणी अवैध हातभट्टी दारू विक्री व निर्मिती होत असल्याची माहिती मिळल्यावरून दि.२ नोव्हेंबर रोजी २ वाजता कारवाई केली. यावेळी सुमारे १६८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राम बब्रू काळे यास ताब्यात घेण्यात आले असून पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement