किल्लेधारूर-लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर कारखान्याने दिपावली २०२१ सणा निमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना १२.५०% बोनस जाहिर केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी दिली. या निर्णयामुळे कारखाना कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याने, कर्मचारी वर्गांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन, त्यांनी कारखाना व्यवस्थापनाचे आभार व्यक्त केले आहेत.
धैर्यशील सोळंके म्हणाले की, मागील सन २०२०-२१ मध्ये कारखान्याने उच्यांकी ८२९४७८ मे.टन उस गाळप,५०५७१०५१ युनिट विज निर्यात, आणि ११८,३०,१४७ लिटरचे विक्रमी इथेनॉलचे उत्पादन घेण्यासाठी कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी,कामगार यांनी महत्वाची भूमिका आहे. पुढील हंगामासाठी १२.०० लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट व तांत्रिक क्षमता मिळविणेचे दृष्टीने प्रोत्साहन म्हणून कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री आ.प्रकाश सोळंके यांनी आज मुख्य कार्यालयात कारखान्याचे सर्व कर्मचारी, कामगार यांना दिपावली निमीत्त १२.५०% बोनस रक्कमेचे वाटप तात्काळ सुरु करण्याचे आदेश कारखाना प्रशासनास दिले आहेत. सर्व कर्मचारी , कामगार यांनी चालू हंगामाचे उस गाळप उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सतर्क राहून कामकाज करणार असून कर्मचारी, कामगार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होवून कामगारांचे वतीने या निर्णयाचे स्वागत करून, कारखान्याचे मार्गदर्शक आ. प्रकाश सोळंके व चेअरमन धैर्यशील सोळंके व कारखाना प्रशासनाचे अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.