Advertisement

श्रावणबाळ,संजय गांधी योजनांचे अनुदान दर महिन्याला द्या

प्रजापत्र | Wednesday, 20/10/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनांचे अनुदानात प्रत्येक महिना ३ हजार रूपये वाढ करून दर महिन्याला पाञ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करा,परतीच्या पावसाने व कोरोनामुळे गावातील शेतमजूर,कामगार यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या सर्व मजूरांना सरकारने तात्काळ मदत करावी याप्रश्नी युवा आंदोलनच्या वतीने सोमवारी (दि.१८) हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.यावेळी मुख्यमंत्र्यांना तहसिलदार यांचे मार्फत मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

                 युवा आंदोलनच्या वतीने तहसिल कार्यालयावर १८ ऑक्टोबर रोजी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.'युवा आंदोलन' ही बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी युवा संघटना आहे.संघटनेच्या वतीने युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांचे नेतृत्वात काढण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चाचे निमित्त देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,ज्येष्ठ नागरिकांसाठी व विधवा,परितक्त्या महिलांसाठी शासनाच्या वतीने श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्यांना महिन्याला मानधन (अनुदान) दिले जाते.वयोवृध्द,विधवा महिला,परितक्त्या त्या अनुदानावर आपली उपजिवीका भागवितात.परंतू,मागील ९ महिन्यांपासून श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाचे वाटप करण्यात आलेले नाही.त्यामुळे वयोवृध्द,विधवा महिला,परितक्त्या परेशान आहेत.सध्या गावपातळीवर रोजगार उपलब्ध नाही.परतीच्या पावसामुळे शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतात रोजगार नाही.त्यामुळे जेष्ठ नागरिक व विधवा,परितक्त्या महिला,शेतमजूर व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तरी शासनाने त्यांना श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व पात्र लाभार्थींचे अनुदानात प्रत्येक महिन्यात ३ हजार रूपयांची वाढ करून त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला नियमित तात्काळ जमा करावे.जेणेकरून संबंधितांवर उपासमारीची वेळ येणार नाही.सदरील निवेदन देताना युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके,महेंद्र कांबळे,प्रशांत दहिफळे,शरद झरे कांबळे,अविनाश मस्के, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

 

Advertisement

Advertisement