अविनाश इंगावले
गेवराई-शहरातील वर्दीचे ठिकाण असलेल्या मोंढ्यात तोतया पोलिसांनी व्यापाऱ्याला लाखाला गंडविल्याचा प्रकार घडला आहे.'आम्ही गेवराई पोलिस ठाण्याचे क्राईम ब्रँचचे अधिकारी आहोत अशी थाप मारून व्यापाऱ्याला भर दिवसा लुटण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात काल रात्री अज्ञात दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रीनिवास भूसार दुकानाचे मालक गंगाभिषण बिहारीलाल भुतडा (वय-५९ ) महेश कॉलनीकडे जात असताना अज्ञात दोन आरोपींनी
मोटारसायकलवर येऊन आम्ही गेवराईचे क्राईम ब्रँचमधून आलो आहोत.काल एका गांज्याच्या कारवाईत तुम्हाला चौकशीसाठी साहेबांनी कार्यालयात बोलविले आहे,आमच्यासोबत चला असे म्हणत गेवराईत चोरीच्या घटना वाढल्याने तुमच्याकडील सोने आणि नगदी रक्कम असा लाखाचा ऐवज आमच्याकडे द्या असे सांगत भरदिवसा व्यापाऱ्याला लुटून तोतया पोलीस फरार झाले.यानंतर भुतडा हे पोलीस ठाण्यात आले असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.