अंबाजोगाई - अंबाजोगाई - लातूर रोडवरील सेलू अंबा टोल नाक्यावर दुचाकी व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण आपघातात एक जण जागीच ठार झाला तर एकजण जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि.०४) सायंकाळी ७ वा. झाला. जखमीवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाता विषयी प्राप्त माहिती अशी की, काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई लातूर रोड वरील सेलू अंबा टोलनाका नजीक लातूर कडुन बीड कडे निघालेल्या एम एच २३ बी सी २१११ क्रमांकाच्या महेंद्रा केयूव्ही ५०० या गाडीची व अंबाजोगाई कडून एम एच २३ के ११५१ क्रमांकाच्या स्प्लेडर या दुचाकीवर आपल्या गावी निघालेले पोखरी येथील रहिवासी व येथील महालक्ष्मी ट्रॅक्टरच्या मालकाचे बंधु फरशीचे कारागीर सुहास निकम व त्यांचे चुलत बंधु राजाभाऊ निकम यांची समोरासमोर धडक होऊन सुहास निकम हा जागीच ठार झाला तर राजाभाऊ निकम हा गंभीर जखमी झाला. राजाभाऊ निकम याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असुन घटनेचे वृत्त समजताच पो. नी मोरे, पो उ नी.केंद्रे, पो ना चौरे, पो हे कॉ नाना राउत यांनी घटनास्थळी धाव घेतली.