Advertisement

धारदार शस्त्राने वार करून अंबाजोगाईच्या तरुणाचा खून

प्रजापत्र | Monday, 04/10/2021
बातमी शेअर करा

 

अंबाजोगाई -दि.३  तालुक्यातील मगरवाडी येथील ३८ वर्षीय तरुणाचा पुण्यातील चुडोबानगर, हुलावळे बेंद्रे वस्तीत धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि.३) दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली.

संतोष विश्वनाथ माने (वय ३८, रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोषच्या पत्नीच्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने संतोष माने यांच्या कपाळावर धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी करत त्यांचा खून केला. ही घटना चुडोबानगर, हुलावळे बेंद्रे वस्ती येथे तुषार साखरे यांच्या चाळीमध्ये भरदिवसा घडली. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, हा खून कोणत्या कारणास्तव झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

Advertisement

Advertisement