Advertisement

बीड, केजमध्ये पुन्हा जोर‘धार’

प्रजापत्र | Friday, 01/10/2021
बातमी शेअर करा

बीड / केज-दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बीड आणि केज शहरात शुक्रवारी (दि.1) पावसाने रात्री साडेनऊच्या सुमारास जोर‘धार’ हजेरी लावली होती. यावर्षी पहिल्यांदाच पावसाळ्यात अकरावेळा अतिवृष्टी झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचे पहायला मिळाले.
बीड जिल्हयात या वर्षी पावसाने जोरधार हजेरी लावली आहे. नदी, नाले, तलाव तुडूंब भरले असून सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी बीड आणि केज शहरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. रात्री उशीरापर्यंत पावसाची संततधारा सुरुच होती. आधीच पिके भूईसपाट झाली असताना पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने आहेत ती पीकेही उध्दवस्त होणार असल्याचे चित्र आहे.

 

Advertisement

Advertisement