Advertisement

सोयाबीन च्या दोन गंजीला आग

प्रजापत्र | Friday, 01/10/2021
बातमी शेअर करा

केज दि.१- मागच्या आठ दिवसांपूर्वी  तालुक्यातील पिसेगाव येथिल शेतकऱ्याची काढून ठेवलेल्या सोयाबीनची गंज पेटून दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले होते. त्यात पुन्हा एक अशीच घटना घडली असून तालुक्यातील कानडी माळी येथील दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन च्या गंजीला आग लागून अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
           तालुक्यातील कानडी माळी येथील गावाच्या पश्चिमेला लहुरी रोड लगत असलेल्या शेतात शंकरलाल संभाजी बनसोडे व शंकर हसा राऊत या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून गंजी लावून ठेवल्या होत्या. परंतु दि.१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दोन्हीही गंजी पेटल्याचे लक्षात आले.परंतु गंजीने मोठा पेट घेतल्याने कांही वेळातच दोन्हीही गंजी जळून राख झाल्या. सदरील आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून त्यामध्ये सर्वच्या सर्व सोयाबीन जळून खाक झाल्याने सुमारे दोन ते अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
          दरम्यान अगोदरच अतिवृष्टीने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांवर हे नवीनच संकट कोसळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement