चौसाळा- नेकनूर पोलिसांनी चौसाळा येथे धडक कारवाई करत गावठी दारूची विक्री करणारे अड्डे उध्वस्त केले. यावेळी हजारो लिटर रसायन फेकून देण्यात आले. ही कारवाई शुकवारी सकाळी करण्यात आली.
बीड तालुक्यातील चौसाळा येथे खुलेआमपणे हातभट्टी दारू विकली जात असल्याची माहिती नेकनूर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे एपीआय शेख यांनी तातडीने कारवाई करत चौसाळा येथील हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त केले. यावेळी हजारो लिटर रसायन फेकून देण्यात आले. या कारवाईत एपीआय शेख यांच्यासह चौसाळा पोलीस चौकीचे ठाणे अंमलदार श्री.डोंगरे, पो.ना. जायभाय, श्री.चव्हाण, श्री.माने, श्री.देशमुख, श्री.घुले सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर हे सहभागी झाले होते.
बातमी शेअर करा