Advertisement

खासदारकीचा पदभार स्वीकारताच रजनीताई पाटील लागल्या कामाला

प्रजापत्र | Wednesday, 29/09/2021
बातमी शेअर करा

केज दि.29 - राज्यसभेच्या नवनियुक्त खा. रजनीताई पाटील यांनी खासदार पदाचा पदभार स्वीकारताच कामाला लागल्या असून बुधवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी केज व अंबाजोगाई तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या गावातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यांच्या नुकसान पाहणी दौऱ्याची सुरवात दुपारी दोन वाजता केज तालुक्यातील नायगाव येथून होणार आहे.
               बीड जिल्ह्यसह तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी ताईंनी तातडीच्या दौऱ्याचे आयोजन केले असून त्या आज दिनांक २९ रोजी शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. 
                  दुपारी 2 वाजता नायगांव, दुपारी 2.30 वाजता सौंदणा, दुपारी 3 वाजता आपेगांव ता. अंबाजोगाई, दुपारी 3.30 वाजता कोपरा ता. अंबाजोगाई, दुपारी 4. वाजता अंजनपूर ता. अंबाजोगाई, दुपारी 4.30 वाजता
देवळा ता. अंबाजोगाई, सायं. 5 वाजता माकेगांव ता. अंबाजोगाई, सायं. 5.30 वाजता, सावळेश्वर पैठण ता. केज, सायं. 6. वाजता केज - बोबडेवाडी रस्ता इत्यादी ठिकाणची पाहणी करणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
                सदर दौ-या दरम्यान त्यांच्या समवेत त्यांचे स्विय सहायक प्रताप मोरे, समवेत यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते असणार आहेत.

Advertisement

Advertisement