अंबाजोगाई - मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने केज, अंबाजोगाई, बीड, तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्यावी, १०० टक्के नुकसान झाल्यामुळे विम्याची १०० टक्के रक्कम देण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी सोमवारी (दि.२७) अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालासमोर थेट रस्त्यावर बसून धरणे आंदोलन केले. यावेळी सर्वाधिक नुकसानग्रस्त तिन्ही तालुक्यातून शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपली व्यथा आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.
बातमी शेअर करा