परळी :- येथील वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष तथा भाजपाचे कार्यकर्ते विनोद अशोक सामत यांची गुरुवारी (दि.२३) सर्वानुमते निवड करण्यात आली. बँकेवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे.
बँकेचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होते. गुरुवारी (दि.२३) सकाळी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बँकेच्या मुख्य कार्यालयात घेण्यात आली. बैठकीत वैद्यनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी विनोद सामत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे. खासदार प्रीतम मुंडे संचालक असलेल्या सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या या बँकेच्या राज्यभर ४२ शाखा आहेत.
विनोद सामत यांचे वडील अशोक सामत हे अनेक वर्ष वैद्यनाथ अर्बन बँकेचे अध्यक्ष होते. ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे विश्वासू होते. रतिलाल मोमया व शहरातील इतर व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बँकेची स्थापना केली होती. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ अर्बन बँकेची भरभराट झाली. बँकेचा राज्यभर कार्य विस्तार झाला आहे.
बातमी शेअर करा