Advertisement

मांजरा धरण बीड जिल्ह्याची आर्थिक नाडी- देशमुख

प्रजापत्र | Sunday, 19/09/2021
बातमी शेअर करा

केज-बीड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे व शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेले मांजरा धरण यावर्षीही भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे ग्रीनबेल्टचा खरा आधार मांजरा धरण असून या भागातील शेतकऱ्यांसह बीड जिल्ह्याची ही आर्थिक नाडी असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. 
          यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, धरणातील पाणी मुबलक प्रमाणात मिळावे असे वाटत असेल तर केवळ हक्क न दाखवता त्याची देखभाल आणि संवर्धन करणं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे धरण प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
         यावेळी या जलपूजन कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, आंबासाखर चे व्हाईस चेअरमन हनुमंत मोरे, प्रविणकुमार शेप,पशुपतीनाथ दांगट, दलील इनामदार, कॉंग्रेसचे केज तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे, भालगावचे माजी सरपंच चंद्रकांत मोरे, कळंब पंचायत समितीचे माजी सभापती रामलिंग आवाड, कबीरोद्दीन इनामदार, अमर पाटील, कपिल मस्के, समीर देशपांडे, रविकांत सोनवणे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुजीत सोनवणे, प्रवीण खोडसे, संभाजी ब्रिग्रेडचे राहुल खोडसे आदींची उपस्थिती होती.
            मांजरा धरण सलग तिसऱ्या वर्षी भरले असून आतापर्यंत १६ वेळेस भरले आहे. इकडे पाऊस कमी असून वर पाऊस झाल्याने धारण भरले आहे. यावर्षी धरण भरले नसते तर ऊस मोडण्याची स्थिती निर्माण होती की काय असे वाटत होते.परंतु धरण भरल्याने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी अभियंता शाहूराज पाटील, आशिष चव्हाण, व्ही.एस.ठोंबरे, पी.पी.आव्हाड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. देशमुख यांनी शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळण्यासाठी कालव्यातून पाणी ठरलेल्या नियमानुसार व नियमितपणे सोडावे अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Advertisement

Advertisement