Advertisement

स्वारातीच्या वैद्यकीय अधिकार्‍याला ५८ हजाराला गंडविले

प्रजापत्र | Thursday, 16/09/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असलेल्या एका डॉक्टरला ऑनलाईन गंडा घालून खात्यातून ५८ हजार ७ रुपये काढल्याची घटना घडली.  याप्रकरणी डॉक्टरांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
              येथील स्वाराती रुग्णालयात डॉ.एकनाथ रमेश वाघीरे (वय-२७) हे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात. डॉ वाघिरे हे रुग्णालय परिसरात असताना त्यांच्या मोबाईल फोनवर अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांची दिशाभूल करीत त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन वेळा ५८ हजार ७ रुपये काढून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी वाघेरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.

Advertisement

Advertisement