Advertisement

नेकनूरमध्ये हातभट्टी अड्ड्यावर धाड

प्रजापत्र | Wednesday, 15/09/2021
बातमी शेअर करा

नेकनूर-पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लिंबागणेश येथील हातभट्टी अड्ड्यावर पोलीसांनी बुधवारी (दि.१५) सकाळी धाड टाकली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात रसायन व हातभट्टी बनवण्याचे साहित्य आढळून आले. पोलीसांनी ५८ हजारांची दारू नष्ट केली असून तिघांना ताब्यात घेतले आहे.  

 

            गेल्या काही दिवसापासून लिंबागणेश येथे हातभट्टी दारू गाळली जात आहे. या हातभट्टी अड्ड्याची माहिती नेकनूर पोलीसांना झाल्यानंतर आज सकाळी पोलीसांनी अड्ड्यावर धाड टाकत रसायनासह दारू बनवण्याचे साहित्य जप्त केले. 58 हजार रूपयाची दारू नष्ट करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, सुशांत सोनवणे, कांबळे, दिडोळ, ढोबळे, घोलप, चव्हाण यांनी केली. या प्रकरणी तिघा जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

Advertisement

Advertisement