Advertisement

एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश

प्रजापत्र | Wednesday, 08/09/2021
बातमी शेअर करा

 

 

 

केज : तालुक्यातील सोनेसांगवी-२ येथे रात्रीच्या वेळी सर्वजण झोपले असताना घरात शिरलेल्या विषारी सापाने दोन चिमुकल्या मुलींसह त्यांचा आईला चावा घेतला. सर्पदंशाने दोन्ही बालिकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या आईवर उपचार सुरू आहेत.  

 

केज तालुक्यातील सोनेसंगवी-२ येथील दीपक साखरे हे त्यांची पत्नी जयश्री साखरे आणि ५ व ३ वर्षाच्या दोन मुली असे संपूर्ण कुटुंब मंगळवारी (दि.०७) रात्री नेहमीप्रमाणे झोपी गेले होते. परंतु रात्री ११ ते १२ च्या दरम्यान दीपक यांची पत्नी जयश्री व दोन मुलींना सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान सदरील घटना घडल्यानंतर तिघींनाही अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जयश्री यांच्यावर उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

Advertisement

Advertisement