परळी-जिल्ह्यात झालेल्या पावसाने रस्त्यांची वाताहत झाली आहे. परळी- अंबाजोगाई महामार्गाचे काम सुरु असून सध्या जोर 'धार' पावसामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामानिमित्त परळी-अंबाजोगाई मार्गावरील कण्हेरवाडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या पुलाजवळील वळण रस्ता व तात्पुरता पुलावरून पाणी वाहत असल्याने परळी-अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व त्यांचे सहकारी भर पावसात घडनास्थळी परिस्थिती हाताळत आहेत. बीड जिल्ह्यात पावसामुळे छोट्या नद्या नाले यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर पूले पाण्याखाली गेले आहेत.