बीडः धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करुन परळित आलेल्या करुणा शर्मांची एक कथित आँडिओ क्लिप समोर आली आहे. यात एक महिला यातून आपल्याला पैसे कमवायचे आहेत असे म्हणताना ऐकू येत आहे. सदर आवाज करुणा शर्माचा असल्याची चर्चा असून यामुळे खळबळ माजली आहे.
क्लिपमध्ये एक व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन काही आरोप करणे म्हणजे कोर्टाचा अवमान होईल, याबाबत ऍड सुषमा सिंह यांनी जारी केलेल्या नोटीसचा उल्लेख करून सांगतोय व त्यामुळे सांभाळून बोला असा सल्ला देतोय. त्यावर महिला 'ये तो बहुत अच्छा हुआ, इसमे तो फायदा है अपना, मै मंदिर जाऊंगी, और रायता फैला दुंगी। अपने को क्या रायता फैलाना है, अपने को पैसे निकालने है प्रेशर बनाके पैसे असे म्हणताना ऐकायला मिळत आहे. सदर महिला करुणा शर्मा असल्याची चर्चा होत असुन यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे.