माजलगाव-घरातील कुरबुरीचे रूपांतर भांडणात होऊन स्वतःच्या आईवर विळ्याने मारलेल्या मुलाने घाबरून आत्महत्या केली असा अंदाज बांधला जात असतानाच त्याचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे.भावानेच भावाची हत्या केली असून पोलीस तपासातून हे प्रकरण समोर आले.
माली पारगाव येथील पारुबाई मचिंद्र कदम आणि त्यांचा मुलगा बापू माचिंद्र कदम यांच्यात घरघुती कारणावरून कुरबुरी होत असत बुधवारी (दि.१) याचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन चिडलेल्या बापू कदम याने आपल्या आईवर विळ्याने वार करून गंभीर जखमी केले.त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान बापू कदम याने माली पारगाव शिवारातील शेतात आत्महत्या केल्याची बातमी समोर आली.परंतु आईवर केलेल्या हल्याचा राग मनात धरत त्यांचा दुसरा मुलगा गणेश माचिंद्र कदम हा देखील आईवर झालेल्या वारावेळी तिथेच होता आईवर झाल्येल्या हल्यामुळे गणेश याने बापू याच्या पाठीमागून नरड्याला हाताने जोराने जीव जाईपर्यंत दाबले व त्याचा खून केला.दरम्यान बापू याची आत्महत्या असल्याची बनाव काही काळ टिकला परंतु ही आत्महत्या नसून हत्या असल्याची कुजबुज परिसरात होत असल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली असता ही घटना समोर आली. गुरुवारी आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून माचिंद्र अंबादास कदम यांच्या फिर्यादीवरून गणेश कदम यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.