Advertisement

 सासरवाडीत राहणार्‍या जावयाची आत्महत्या  

प्रजापत्र | Friday, 27/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 बीड : सासरवाडीत बटईने शेती करुन पत्नी व मुलांसह राहणार्‍या एका इसमाने बुटाच्या लेसने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. तालुक्यातील आहेरवडगाव येथे गुरुवारी (दि.२६) पहाटे ४ ते सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

हेही वाचा...  आज कोरोनाबाधितांची संख्या सव्वाशेवर http://prajapatra.com/2981
 

 

अशोक शिवराम बरडे (५०, रा.पाडळी, ता.शिरुरकासार, हमु.आहेरवडगाव, ता.बीड) असे मयताचे नाव आहे. अशोक यांच्या दोन मुली विवाहित असून दोन मुले व पत्नीसह सासरवाडी असलेल्या आहेरवडगाव येथे गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास होते. गावातीलच एकाची जमिन ते बटईने पाहत होते. गुरुवारी पहाटे त्यांनी दारुच्या नशेत बुटाच्या लेसने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवनयात्रा संपवली. कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बीड ग्रामीण ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास आवारे, पोहेकॉ.आनंद मस्के, दिनेश ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलवला. या प्रकरणी मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन ग्रामीण ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

 

Advertisement

Advertisement