Advertisement

 विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

प्रजापत्र | Wednesday, 25/08/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड दि.२५ (प्रतिनिधी)- सोयाबीन पिकावर औषध फवारणी करताना अचानक विजेची तार तुटून पडल्याने शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आहेर धानोरा येथे घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

बीड तालुक्यातील आहेर धानोरा येथील विनायक कानोजी फाटक (वय ३९) हे आज  सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेतात सोयाबीनवर औषध फवारणी करत होते. यावेळी अचानक विद्युत तार तुटून पडल्याने शॉक बसला.त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.

 

 

हेही वाचा.. 
आष्टी वगळता इतर तालुक्याला दिलासा 
http://prajapatra.com/2959

 

 

Advertisement

Advertisement