Advertisement

आज १७० बाधित रुग्ण 

प्रजापत्र | Monday, 26/07/2021
बातमी शेअर करा

 

 

 बीड-  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग  अद्यापही कायम असून सोमवारी (दि.२५)  ३५९७ नमुन्यांमध्ये  १७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३४२७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.आजचा पाॅझिटव्ही रेट ४.७२%असून गेल्या चार दिवसांपासून तो स्थिर आहे.त्यापूर्वी यात टप्याटप्याने घट होत होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून वाढलेले प्रमाण कायम आहे. परळी तालुक्यात आज एकही रुग्ण बाधित नाही मात्र आष्टी तालुक्यात बाधित रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण ५८आष्टीत आहे. बीड शहरात गेले अनेक दिवसांपासून रुग्णांमधील झालेल्या घटीमध्ये आज दुप्पट वाढ झाली आहे असून सुमारे २० रुग्ण आहेत तर तालुक्यात ३९ रुग्ण आहेत

 

 

सोमवारी अंबाजोगाई ६, आष्टी ५८,बीड ३९,धारूर २१,गेवराई ४,केज ६,माजलगाव ५,पाटोदा २०,शिरूर ७,वडवणीत चार रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागात   रुग्ण संख्या वाढू लागली आहे  .

 

 

Advertisement

Advertisement