Advertisement

दहावीचा निकाल ९९.९५ टक्के

प्रजापत्र | Friday, 16/07/2021
बातमी शेअर करा

मुंबई-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुपारी एक वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार आहेत. दहावीच्या निकालात कोकणाने बाजी मारली असून १०० टक्के निकाल लागला आहे.

 

 

राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावी चा निकाल जाहीर आज शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्यात नऊ विभागीय मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल १०० टक्के कोकण विभागाचा लागला असून सर्वांत कमी निकाल ९९.८४ टक्के नागपूर विभागाचा आहे.यंदा या परीक्षेसाठी आठ माध्यमांतील ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ७८ हजार ६९३ मुली असे एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी प्रविष्ट होते. लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती रद्द करण्यात आली.

 

Advertisement

Advertisement