बीड-विहित मुदतीत चेक क्लियरिंगसाठी दिल्यानंतरही चेक क्लियर न करता अनादर केल्याप्रकरणी एसबीआय बँकेला ग्राहक मंचने सात हजार रुपये दंड केला आहे. तक्रारदार डॉ अनिल बारकुल यांना झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी ही रक्कम तातडीने त्यांना देण्याचे आदेश मंचने दिले आहेत.
बीड येथील नावाजलेले फिजिशियन डॉ अनिल बारकुल यांनी 28 जून 2016,20 सप्टेंबर 2017 आणि 8 ऑक्टोबर 2018 रोजी तीन चेक एसबीआय ला जमा केले .हे चेक विहित मुदतीत जमा केले,मात्र तरीही ते जमा झाले नाहीत अन रक्कम खात्यावर प्राप्त झाली नाही. याबाबत डॉ बारकुल यांनी वारंवार बँकेशी संपर्क केला मात्र त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही .अखेर डॉ बारकुल यांनी ग्राहक मंचात धाव घेतली .या प्रकरणी सुनावणी अंती ग्राहकमंचने एसबीआय बँकेला सात हजार रुपये डॉ बारकुल यांना देण्याचे आदेश दिले .शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी पाच हजार अन तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. देशभरात नेटवर्क असलेल्या एसबीआय चा भोंगळ कारभार यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे.