Advertisement

शस्त्राचा धाक दाखवत राजेगावात जबरी चोरी

प्रजापत्र | Wednesday, 09/06/2021
बातमी शेअर करा

 माजलगाव-गळ्यावर शस्त्र ठेवून धाक दाखवत तालुक्यातील राजेगाव येथे जबरी चोरी करण्यात आली. यावेळी चोरट्यांनी रोख रकमेसह दीड लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी (दि.8) मध्यरात्री घडली.

 

 

तालुक्यातील राजेगाव येथील किराणा दुकानाचे व्यापारी जगदीश रामलाल मालू (वय 42) हे आपल्या कुटुंबासह या ठिकाणी राहतात व घरातूनच किराणा दुकान चालवतात.मंगळवार दि.7 रोजी रात्री दहा वाजता जेवण करून मुख्य चॅनेलचे गेट लाउन मालू झोपले होते.यावेळी त्यांनी वडिल आजारी असल्याने घरातील दरवाजे वडिलांना रात्रीतून लघवी येत असल्याने उघडे ठेवले होते.जगदीश मालू रात्री साडेबारा वाजता लघवी साठी उठुन झोपले.दरम्यान त्यानंतर तासाभराने चॅनलचे गेट तोडून अज्ञात चार चेहर्‍यावर मास्क बांधलेल्या चोरट्यांनी घरात प्रवेश केला.या आवाजाने त्यांची पत्नी पूजा उठल्या आणि जोराने ओरडल्या.यावेळी चोरट्यांनी घरातील सर्वांना शास्त्राचा व हातातील तांबीचा धाक दाखवून धमकावले.व जगदीश मालू यांच्या पत्नीच्या गळ्याला चाकु लावुन 17 ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण अ.किंमत 54 हजार, तीन ग्रॅम कानातील बाजीगल अंदाजीत किंमत 12 हजार 800 रुपये,दहा ग्रॅम सोन्याचे लाकेट किंमत 32 हजार रुपये,व पाच-पाच ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या किंमत 48 हजार रुपये यासह दुकानातील नगदी गल्ल्यातील दीड हजार रुपये असा एकूण 1 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बुधवार दि.8 रोजी जगदीश मालू यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement