किल्लेधारूर दि.26 एप्रिल - शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा कोरोना (Corona) जागृतीसाठी सतत जनजागृती करणारे राजकुमार वसंतराव पिलाजी उर्फ राजूसेठ यांचे लातूर (Latur) येथे उपचार सुरु असताना निधन झाले. राजूसेठ यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
(Corona defeated the eminent merchants of Dharur; Prince Pilaji dies.)
कोरोना (Corona) संकट काळात प्रत्येकाला काळजी घेण्याचे आवाहन करणारे व वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांचा विमा उतरवणारे राजूसेठ पिलाजी खरे कोरोना योध्दा होते. अत्यंत तळमळीने ते आपल्या मित्रपरिवारासह कामगार व शहरातील नागरीकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करण्याची विनंती करत. आठ दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर लातूर (Latur) येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
राजकुमार वसंत पिलाजी नावाचे ट्रेडींग कंपनी येथील मोंढ्यात ते चालवत. शहराच्या राजकीय घराण्यात त्यांच्या कुटूंबियांची ओळख होती. त्यांचे वडिल वंसतराव पिलाजी नगर पालिकेचे उपाध्यक्ष होते. तर त्यांचे बंधू व वहिनी पालिकेच्या नगरसेवक राहिले आहेत.
पिलाजी कुटूंबातील गेल्या काही वर्षात सर्वात ज्येष्ठ सुधीर पिलाजी व यानंतर नगरसेवक सुनिल पिलाजी यांचे निधन झाले. आज सर्वात लहान राजकुमार पिलाजी यांचेही निधन झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.