परळी : तालुक्यातील नागापूरमध्ये कोरोनाचे तब्बल पाच बळी गेल्याची प्राथमिक माहिती बुधवारी (दि.14) रात्री उशीरा मिळाली. आरोग्य विभागाने या बाबत अधिकृत माहिती दिली नसून या बळींच्या संख्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरल्याची चर्चा सुरु आहे.मृतांमध्ये एका 50 वर्षीय महिलेचा समावेश असून उर्वरित चार पुरुष हे 60 ते 70 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.
नागापूरमध्ये चौघे आणि तेथून जवळच असलेल्या बहादूरवाडी मधील एक जणाचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हे पाचही जण रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. यातील तिघे अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात तर दोघे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना आज (दि.14) त्यांचा मृत्यु झाला आहे.आरोग्य विभागाने या बाबत अधिकृत माहिती दिली नसून या घटनेमुळे गावभर शोककळा पसरल्याचे सांगितले जात आहे. या बाबत गुरुवारी (दि.15) सकाळी अधिकृत माहिती समोर येईल.