Advertisement

पैशाच्या व्यवहारातून मजूर व मुकादमात तुंबळ हाणामारी

प्रजापत्र | Saturday, 27/03/2021
बातमी शेअर करा

माजलगाव-तालुक्यातील मोगरा येथे पैशाच्या व्यवहारातून मजूर व मुकादमात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन १९ जणांवर दिंद्रूड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

ऊसतोड मुकादम दगडू घनगाव (रा.मोगरा) यांचे गावातीलच सूरज आलाट यांच्यासह १३ मजुरांकडे ऊसतोडीचे पैसे थकीत होते. त्याबाबत घनगाव यांनी आलाट यास पैशांच मागण केली तेव्हा तुझे पैसे देत नाहीत आणि तुझ्याकडे कामही करायला येत नाहीत काय करायचे तर कर असे म्हणून आलाट यांनी दमदाटी करत काठ्या,कुऱ्हाडी,तलवार,कोयते,लोखंडी बांबूंनीमारहाण केली. या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले.

 

दगडू घनगाव यांनी दिंद्रूड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन मनोज  आलाट, सूरज आलाट, बाळू आलाट, अमर आलाट, पवन कांबळे, किशोर आलाट,संजय आलाट, भाऊ शिंदे, राजाभाऊ आलाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सूरज आलाट या मजुराच्या फिर्यादीवरुन दगडू घनगाव, यादा घनगाव, सुरेश घनघाव, मधुकर घनघाव,विकास घनघाव, सुनील चोपडे,बाळू घनघाव,आकाश घनघाव, सुभाष घनघाव,साधू घनघाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, बीट अंमलदार नंदू वाघमारे तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement