मुंबई – राज्यभरातील दहावी आणि बारावीच्या परिक्षासाठी होम सेंटर असणार आहे तसेच विद्यार्थ्यांना तीन तासाव्यक्तिरिक्त अधिकचे किमान पंधरा मिनिटं आणि जास्तीत जास्त एक तासाचा वेळ वाढवून दिला जाणार आहे .राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली .
मुंबई, पुणे,नागपूर, औरंगाबाद, अमरावती आदी शहरांची परिस्थिती लक्षात घेता राज्यभरातील सर्वच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय आज जाहीर केला.
यामुळे राज्यातील तब्बल 30 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
– दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार.
– दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे या कालावधीत
– बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार
– विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा देता येणार.
– विद्यार्थ्यांना परीक्षे दरम्यान कोरोनाची लागण झाल्यास जूनमध्ये विशेष परीक्षा होणार.
– दहावी-बारीवीची प्रॅक्टीकल म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर होईल.
– विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव नसल्याने ३० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येईल.
– दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखी पेपरसाठी ६० मिनिट एक तास अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आला आहे.