मित्रांनो, प्रत्येकाला काही ना काही तरी करून दाखवायचे असते, बनून दाखवायचे असते, आयुष्यात पुढे जायचे असते. विद्यार्थी असेल तर त्याचे ध्येय चांगले गुण मिळवायचे असते, शिक्षण पूर्ण झाले असेल तर त्याला नोकरी मिळवायची असते, कोणी नोकरीत असेल तर त्याला प्रमोशन मिळवायचे असते, कोणाला उद्योग धंद्यात स्थिर स्थावर व्हायचे असते, मोठे घर बांधणे, लग्न करणे अशी प्रत्येकाची ध्येये असतात. मग हि ध्येय साध्य करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो ती झाली आपली कृती. अनेक जण जे ध्येय निश्चित करतात ते प्राप्त करण्यासाठी जीव तोडून मेहनत करतात. मात्र अशा प्रयत्नवादी व्यक्तींची संख्या बोटावर मोजण्या इतकी म्हणजे प्रत्यक्षात फार कमी असते. बहुतेक लोक गोल निश्चित करतात मात्र ते साध्य करण्यासाठी ते प्रयत्न करताच नाहीत. त्यांची ध्येये मनातच किंवा फार तर कागदावरच असतात. मग काय.... आपले स्वप्न पूर्ण करू न शकलेलया या व्यक्ती करणे सांगू लागतात. त्यांच्या दृष्टीने करणे काहीहि असोत आपल्याला त्यांच्या अपयशाची कारणे माहिती हवीत. काय असतील ही कारणे
कृतीचा अभाव : आपली स्वप्ने प्रत्यक्षात न येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आपण स्वप्न तर पाहतोय मात्र त्या पद्धतीने कृती करत नाहीत. 'मी अमुक करेन, तमुक कारेन अशा बढाया मारणारी लोक प्रत्यक्षात काहीही न करता स्वस्थ बसलेली असतात. यांची स्वप्ने साऱ्या जगाला माहिती असतात मात्र यांच्यात कृतीचा अभाव असल्याने यांची स्वप्ने हि स्वप्नेच राहतात.
योजनांचा अभाव : If you fail to plan, you plan to fail हे जगप्रसिद्ध वाक्य व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या. तुम्ही जर योजना आखण्यात अपयशी ठरला तर तुम्ही अपयशी होण्याची योजना आखत आहेत हे नक्की. आणि हो नुसती योजना आखून उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी करणेही आवश्यक असते.
जीवनात यशस्वी होणाऱ्या काही जणांची नवे डोळ्यासमोर आणा. या व्यक्तींनी केवळ ध्येये आखलीच नाहीत तर ती अमलात आणण्यासाठी तोषीने प्रयत्न केले.
सचिन तेंडुलंकरचे उदाहरण घ्या.... अगदी लहान वयात बॅट हातात धरणाऱ्या सचिनने केवळ मी क्रिकेटपटू होणार असे स्वप्न पहिले असते आणि अंमलबजावणी केली नसती तर.....किंवा सुरेख गळ्याची देणगी लाभलेल्या लता मंगेशकर यांनी गाण्याचा रियाझ, सरावच नसता केला तर......
बरेच जण योग्य मार्गदर्शनाची वाट पाहतात. मात्र असे करून ते pioneer होण्याची संधी गमावतात. स्वतः स्वतःचे मार्गदर्शक व्हावे आणि वाटचाल करावी, भलेही सुरुवातीला अपयश येई मात्र नंतर जे मिळेल ते सुखकारक यश असेल.
हे झाले त्यांच्याबद्दल ज्यांचे काही ना काही ध्येय असते, मात्र ७५ % लोकांना स्वतःची ध्येयच नसतात. जसे जमेल तसे, किंवा ठेविले अनंते तची राहावे अशी त्यांची वृत्ती असते. आजचे निभतंय ना... मग झाले.... उद्याचे उद्या पाहू हि त्यांची वृत्ती त्यांना दुसऱ्यांच्या हाताखाली नोकर म्हणून काम करण्यास प्रवृत्त करते.
आणि हो अनेक जण असेही असतात जे लोक काय म्हणतील याचा विचार करतात.. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग..... खरे आहे ना... आपण केवळ दुसरे आपल्या कृतीचा, व्यवसायाचा काय विचार करतील याचा विचार करतात आणि कोणतीही कृती करत नाहीत. यामुळे देखील आपण अपयशी होण्याकडे मार्गक्रमण करत असतोत.
अंग उकळेपर्यंत काम करण्याच्या वृत्तीचा अभाव : जर एखाद्या ध्येयाप्रती आपण गंभीर असु, तर आपण ते ध्येय गाठण्यासाठी प्रचंड मेहनत केलीच पाहिजे. भेळेची आपल्या रस्त्यात कितीही अडथळे येवोत. आपण पुढे पुढे गेले पाहिजे. मात्र एका टप्प्यावर आपण प्रयत्न करणे सोडून दिले किंवा आपल्या कामात पॅशन नसेल तर नक्कीच आपल्याला यश मिळणार नाही. कपिल देव ने एका मुलाखतीत म्हटले आहे कि तुमची आवड हा तुमचा छन्द बनला पाहिजे आणि तुमचा छंद हा आत्यंतिक आवड बनून तुमचे करिअर बनला पाहिजे. थोडक्यात आपल्याला जे आवडते त्यात करिअर करा भलेही त्यात पैसे कमी मिळतील मात्र सुख समाधान नक्कीच मिळेल.