नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश नव्याने निर्देश दिले आहेत. केवळ लॉकडाऊन करून पर्याय निघणार नाही तर कंटेन्मेंट झोन झोन (containment zone) जाहीर करा आणि कठोर उपाययोजना करा, असे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत.
जगाचा विचार करता कोरोनाबाधितांचा आकडा 120,761,841 पर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत 2,671,720 इतक्या कोरोनाबाधितांचा मृत्यू (Deaths)झाला आहे. तर कोरोनामुक्त 97,402,129 जण झाले आहेत. अमेरिकेनंतर ब्राझिलचा क्रमांक लागतो. तर तिसरा क्रमांक भारताचा लागत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारतामध्ये एकूण11,409,524 कोरोनाबाधित रुग्ण असून यात 24,366 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा 158,892 इतका असून काल 130 जणांची भर पडली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाचे 15 हजार 51 नवे रूग्ण गेल्या 24 तासांत वाढले आहेत. यात 48 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 1 हजार 713 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. सलग पाचव्या दिवशी राज्यात 15 हजारांहून जास्त रूग्ण वाढले आहेत.
केंद्र सरकारने निर्देश काय म्हटले?
- केवळ लऑकडाऊन करून पर्याय निघणार नाही तर कंटेन्मेंट झोन झोन जारी करण्याची गरज आहे.
- प्रत्येक सकारात्मक प्रकरणात, कमीतकमी 20 ते 30 जवळचे संपर्क (कौटुंबिक संपर्क, सामाजिक संपर्क, कामाच्या ठिकाणी संपर्क आणि इतर प्रासंगिक संपर्कांसह) त्वरित शोधून काढणे आवश्यक आहे.
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये गुंतलेल्या फील्ड कर्मचार्यांना प्रशिक्षण, पुनर्रचना आवश्यक आहे आणि संपर्क साधण्यासाठी परस्परसंवादाची कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. आयसीएमआर मार्गदर्शक तत्त्वांनुसार
- (एक्सपोज झाल्यानंतर 5-10 दिवस) सकारात्मक प्रकरणातील संपर्कांची काटेकोरपणे तपासणी केली पाहिजे.