Advertisement

10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 'गुड न्युज'

प्रजापत्र | Sunday, 14/03/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.१४ - शालेय शिक्षण विभागाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा विषयनिहाय तासिकांचे वर्ग डीडी सह्याद्री वाहिनीवर सुरु करण्याचा निर्यण घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाची ट्विटवरुन माहिती दिली आहे.                            त्यामुळे येत्या १५ मार्चपासून १० वी १२ वी वर्गाच्या तासिका सुरु होणार आहेत. यामध्ये इयत्ता दहावीच्या तासिका सोमवारी दुपारी १२.३० ते १.०० तर मंगळवार ते शुक्रवारी दुपारी १२.३० ते १.०० आणि १.३० ते २.०० या वेळात होणार आहेत. तर इयत्ता बारावीच्या तासिका सोमवारी ते शुक्रवारी २.३० ते ३.३० दरम्यान होणार आहेत. या इयत्ता निहाय व विषय निहाय दैनंदिन वेळापत्रक विद्यार्थ्यांना www.maa.ac.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
                     नुकतेच दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले. या वेळापत्रकाप्रमाणे १० वीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते२० मे २०२१ दरम्यान होणार आहेत. तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर १६ फेब्रुवारी २०२१ पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement