मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनसंबंधी मोठं विधान केलं आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसात प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल.ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत आणि लोकं नियमांचे पालन करीत नाहीत त्या ठिकाणी लॉकडाऊनसंदर्भात पडताळणी करण्यात येईल असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.दरम्यान आता मुख्यमंत्र्याच्या या भूमिकेनंतर राज्यातील कोण-कोणत्या शहरात लॉकडाऊन होते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
बातमी शेअर करा