एकीकडे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार एप्रिल मे 2021 मध्ये होणार असून त्या ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत सांगितले. मात्र, त्याच दरम्यान राज्यातील ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणात 61 टक्के विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा ऑनलाइन पद्धतीने व्हावी अस मत मांडलाय .तर ऑनलाइन शिकताना अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने 33 टक्के विद्यार्थ्यांनी यंदाची एप्रिल मे मधील बोर्ड परीक्षाच न देण्याचा निर्णय या सर्वेक्षणात मांडला आहे. त्यामुळे बोर्ड परीक्षा घेणाऱ्या राज्य मंडळाला त्यासोबत राज्यातील बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि त्यांचे शिक्षक यांच्या दृष्टिकोनातून महत्वच्या अशा अनेक प्रश्न आणि त्याबाबतच मत सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
बातमी शेअर करा