माजलगाव -नवीन भाटवडगाव वसाहतीत चोरट्याने धुमाकूळ घालत मध्यरात्री येथील रहिवासी असलेल्या ग्रामसेवकांचे घर फोडले.यामध्ये रोख रक्कम व सोन्या चांदीचा ऐवज लंपास करण्यात आला असून घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले आहे
नवीन भाटवडगांव वसाहतीत ग्रामसेवक नवनाथ पवार यांचे घर आहे रात्री ३ ते साडेतीन च्या दरम्यान चोरट्यानी घरातील इतर असणाऱ्या किरायदार यांच्या घराचे कड्या बाहेरून लावून घेत पवार यांच्या घरात प्रवेश केला. पवार यांचा खरेदी विक्रीचा व्यवहार आज होणार होता त्यासाठी काही मोठी रक्कम घरात आणून ठेवली होती. चोरट्यानी घरात प्रवेश करून दाबदडब् करत घरातील काही रक्कम आणि सोन्याचा काही ऐवज लांबवला.सदरील घटनेत मोठ्या प्रमाणावर ऐवज गेल्याची कुजबुज परिसरात होती,तात्काळ घटनास्थळी श्वानपथक दरोडा प्रतिबंधक पथक आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सह कर्मचारी यांनी भेट देत घटनास्थळावरून चोरट्यांचे फिंगर प्रिंट मिळवले आहेत.सदरील घटनेने खळबळ उडाली असून गेल्या काही दिवसात चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसून येते आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा