मुंबई -पूजा चव्हाण प्रकरणावरुन अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती. आता स्वतः संजय राठोड यांनी राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाने घाणेरडे राजकारण करुन माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे.' असे राठोड म्हणाले आहेत.
संजय राठोड याविषयी बोलताना पुढे म्हणाले की, 'मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. मात्र अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी प्रसारमाध्यम, समाज माध्यमातून घाणेरड्या प्रकारडे राजकारण केले जात होते. मीडियातून माझ्या समाजाची, माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात होता. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार केला गेला. असे राठोड म्हणाले.पूजा चव्हाण प्रकरणावरुन अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती. आता स्वतः संजय राठोड यांनी राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाने घाणेरडे राजकारण करुन माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे.' असे राठोड म्हणाले आहेत.
या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी करण्यात यावी
पुढे बोलताना राठोड म्हणाले की, 'गेली तीस वर्ष मी केलेले राजकीय आणि सामाजिक काम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, हीच माझी मागणी आहे. याचा तपास व्हावा, मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य लवकर बाहेर यावे, अशी माझी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना हे सांगून मी राजीनामा दिला' असे राठोड म्हणाले.