Advertisement

खाजगी रुग्णालयात मिळणाऱ्या लसीची किंमत ठरली

प्रजापत्र | Sunday, 28/02/2021
बातमी शेअर करा

नवी दिल्ली दि.२८ - काेराेना लसीकरणाचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून सुरू झाला हाेता. आता दुसरा टप्पा साेमवार, 1 मार्चपासून सुरू हाेत आहे. त्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेले 45 वर्षांवरील नागरिक लस घेऊ शकतात. लस घेण्यास पात्र व्यक्ती खासगी रुग्णालयातून काेराेनाची लस टाेचून घेऊ शकतात. त्यासाठी 250 रुपये एका डाेसचे शुल्क निश्चित केले आहे.

               लसीची किंमत 250 रुपये असून 100 रुपये सेवेसाठी आकारण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालये यापेक्षा जास्त शुल्क आकारू शकत नाहीत, असं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु आहे. जवळपास 652 केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण 5 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्संना कोरोना लस देण्यात आली आहे.

                दरम्यान पुढील सूचना मिळेपर्यंत हेच शुल्क राहणार आहे, असे राष्ट्रीय आराेग्य मिशनच्या अतिरिक्त सचिव वंदना गुरनानी यांनी स्पष्ट केले. सरकारी रुग्णालयांमध्ये लसीकरण माेफत राहणार आहे

Advertisement

Advertisement