गेवराई दि.२७ (वार्ताहार) - तालुक्यातील गंगावाडी याठिकाणी विना रॉयल्टी तसेच अनधिकृतरित्या वाळू उपसा करून त्यांची टिप्परच्या साह्याने वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहीती पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली होती.
त्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख विलास हजारे यांच्यासमवेत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली व त्याठिकाणाहून २६ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणाविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गून्हा नोंद केला आहे.या कारवाईत एका वाळू माफियाने पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे पोलिसांनी त्याला चोपही दिला असल्याची माहिती आहे. .या गुन्हयाची फिर्याद स्वतः विलास हजारे यांनी तालवाडा पोलीस ठाण्यात दिली असून या प्रकरणाचा पुढील तपस तलवाडा पोलीस करत आहेत.
परिसरात होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती स्थानिक पोलिसांना नसते का ?
तालुक्यातील गंगावाडी शिवारात अवैध वाळूची वाहतूक होते याची माहिती बीड पोलीस अधीक्षकांच्या पथकाला लागते. परंतु स्थानिक पोलिसांना याबाबत काहीच कल्पना नसते का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.