Advertisement

रस्ता प्रश्नी उसाच्या फडातच आत्मदहन करण्याचा इशारा

प्रजापत्र | Friday, 26/02/2021
बातमी शेअर करा

केज दि.26 - तालुक्यातील सोनेसांगवी नं.1 येथिल सर्वे नं.21.22,15,25 या  सर्वे नंबर मधिल उसासाठी शिवारातुन उस वाहतुकीस रस्ताच नसल्याने कारखान्याचे गाळप बंद होत आले तरी ऊस तसाच आहे. सदरील शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध नाही झाला तर मोठे नुकसान होणार असून येत्या चार दिवसांत रस्ता उपलब्ध करून द्यावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
       सोनेसांगवी नं.1 येथील महादेव बाळासाहेब इखे, आनंत आबासाहेब कणसे,मारुती नानासाहेब कणसे, रामेश्वर शाहुराव गुळवे, शिवाजी हरीभाऊ इखे, पांडूरंग उत्तम इंटर, चांगदेव छगण यादव इत्यादी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उसाची लागवड करण्यात आलेली आहे. ऊसास 13 ते 14 महिने झाले असुन ऊस कारखाण्याचा गळीत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र शेतातील ऊस वाहून नेण्यास वाट नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे  मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची वेळ आलेली आहे.
         दरम्यान येत्यातरी 4 दिवसात  दखल न घेतल्यास दि. 2 मार्च 2021 रोजी  उसाच्या शेतातच आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सदरील प्रश्नी तात्काळ तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकुंद कणसे यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement