Advertisement

ऑनलाईल नोंदणी केली नसेल तर कोरोनाची लस मिळणार का?   

प्रजापत्र | Friday, 26/02/2021
बातमी शेअर करा

  देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू होत आहे. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या नागरिकांना लसीसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. लसीकरण सरकारी रुग्णालये तसेच काही निवडक रुग्णालयात होणार आहे. लसीकरणासाठी सोमवार 1 मार्चपासून कोविड प्लॅटफॉर्मवर नोंदणी सुरु होणार आहे. सरकारने लसीकरणासाठी 10 हजार शासकीय आरोग्य केंद्रे निश्चित केली आहेत. तेथे ही लस विनामूल्य दिली जाईल. या व्यतिरिक्त खरेदी करुनही लस घेतली जाऊ शकते.
नोंदणी न केल्यास लस मिळणार का?

लसीकरणासंदर्भात यावेळी सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जे नोंदणी करत नाहीत त्यांना लस मिळणार की नाही? ऑनलाईन नोंदणी व्यतिरिक्त लोकांना 'वॉक इन रजिस्ट्रेशन' ची सुविधा देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना मोबाईल जास्त हाताळता येत नाही किंवा ऑनलाईन नोंदणी करता नाही, ते थेट रुग्णालयात जाऊन ही लस घेऊ शकतात. मात्र ऑनलाईन नोंदणी किंवा अॅपद्वारे नोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल असं बोललं जात आहे.

लसीसाठी आपली नोंदणी कशी करावी

सरकारी अधिसूचनेनुसार, ही लस घेण्यासाठी नागरिकांनी प्रथम को-विन अ‍ॅपवर नोंदणी केली पाहिजे. एकदा नोंदणी झाल्यावर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. यामध्ये लस घेण्याची तारीख, ठिकाण आणि वेळ याविषयी माहिती देण्यात येणार आहे.

नोंदणीसाठी कोणती ओळखपत्रे वैध असतील?

आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, जॉब कार्ड, मनरेगा कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, खासदार, आमदार व एमएलसी यांनी दिलेली अधिकृत ओळखपत्र इत्यादी ओळखपत्र नोंदणीस वैध असतील.

Advertisement

Advertisement