Advertisement

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडली स्फोटकांनी भरलेली कार

प्रजापत्र | Thursday, 25/02/2021
बातमी शेअर करा

मुंबई-प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ इमारतीजवळ गुरुवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली आहे. या कारमध्ये जिलेटिन कांड्या होत्या. अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची भव्य ‘अँटिलिया’ इमारत आहे. अँटिलियापासून जवळच काही अंतरावर एका स्कॉर्पियो कार उभी होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. कारमधून जिलेटीन सदृश्य वस्तू ताब्यात घेतल्याचे गृहराज्यमंत्री शभूराजे देसाई यांनी सांगितले. अँटिलियाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर आता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

Advertisement

Advertisement