माजलगाव: वाळूच्या गाड्या सोडण्यासाठी ६५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांचा जामीन अर्ज माजलगावच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
शुक्रवारी माजलगावचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड आणि त्यांच्या चालकाला ६५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी जालना येथील एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते . त्यानंतर त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठंडाईची मुदत संपल्याने श्रीकांत गायकवाड यांना आज (दि. २२ )न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनवाल्यानंतर गायकवाड यांनी जामिनासाठी अर्ज केला. यावर सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्यसमोर सुनावणी झाली. या प्रकरणात अनेक कागदपत्रे हस्तगत करायची बाकी असून आरोपी जामिनावर सुटल्यास सदर कागदपत्रे मिळण्यात अडचण येऊ शकते असा युक्तिवाद सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अजय तांदळे यांनी केला. हा युक्तिवाद मान्य करीत माजलगाव न्यायालयाने श्रीकांत गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.