बीड-राज्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण अचानक वाढू लागले असून बीड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांचा आकडा वाढला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले.मागील दोन दिवस कोरोनाने जिल्ह्यात अर्धशतक केल्यानंतर सोमवार (दि.२२) रोजी ३९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने कोरोनाची खबरदारी घेण्यासाठी नागरिकांना मास्क,सॅनिटायझर,सामाजिक अंतराचे नियम पाळण्याचे आवाहन केले असून बीड जिल्ह्यात पुन्हा काही प्रमाणात कोरोनाने डोके वर काढण्यास सुरु केले.सोमवारी पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई-१७,बीड-१२ व इतर तालुक्यात १० रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाला गांभीर्याने घ्या-धनंजय मुंडे
बीड-बीड जिल्हा वासीयांनो सावधान ! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसून येत असून आपण या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. मास्कचा सतत वापर करा, शासकीय नियमांचे पालन करा. गर्दी करणे टाळा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा एकदा काही प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. दररोज १५-२० च्या आसपास असलेली रुग्णसंख्या एकदम ५० च्या पार गेलेली आकडेवारी गेल्या आठवड्यात समोर आल्याने या आकडेवारीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.