Advertisement

परवानगी नसतानाही सामुदायिक विवाह सोहळा

प्रजापत्र | Monday, 22/02/2021
बातमी शेअर करा

बीड दि.२२ - बीडमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणााऱ्या आयोजकांसह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेेेच नव्हे तर या विवाह सोहळ्याला आमदार, खासदाराची उपस्थिती होती. विवाह सोहळ्यात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला होता. याप्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट घोंगावत असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे सामूहिक विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी जमली होती. या विवाह सोहळ्यात मास्क, सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा उडाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या सामुदायिक विवाह सोहळ्याला परवानगी नाकारली असताना मिरवणूक आणि विवाहसोहळ्याला गर्दी जमा केल्याने 25 जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement