बीड-(प्रतिनिधी)दि.20 – राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना बीड जिल्ह्यात शनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.
आरोग्य विभागाच्या 436 संशयित अहवालात 58 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक बीडमधील 25 रुग्णांचा समावेश आहे.यासोबत अंबाजोगाईत 13,आष्टी 3, माजलगाव 3, परळीत 4,पाटोदा 2, शिरूर 2, धारूर 2, केजमध्ये 4 रुग्ण आढळून आले आहेत.
बातमी शेअर करा