Advertisement

अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक, त्याला भारतावर बोलण्याचा अधिकार नाही- जितेंद्र आव्हाड

प्रजापत्र | Thursday, 18/02/2021
बातमी शेअर करा

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांना तीव्र शब्दात फटकारले.
आव्हाड म्हणाले की, 'देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला बोलण्याचा अधिकार नाही. तो कॅनडाचा नागरिक आहे. अमिताभ बच्चनही काही देशाचा आदर्श नाहीत. या लोकांनी राजकारणात हात घालण्याची गरज नाही. त्यांची राजकीय कोंडी झाली आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना लाचारी करावी लागते हे दुर्दैवं असल्याचे आव्हाड म्हणाले.

काय म्हणाले नाना पटोले ?

मनमोहन सिंग सरकारच्या काळात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून डीझेल-पेट्रोलच्या वाढत्या किंमतींवर बोलत होते, मात्र आता त्यांनी यावर मौन बाळगले आहे. आता या गोष्टींचा विसर पडल्याने, भविष्यात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, तसेच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Advertisement

Advertisement